Sharad Pawar : लोकांच्या हितासाठी सत्ता वापरायची असते पण याची जाणीव आज सत्ताधाऱ्यांना नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला नेल्याचे पवार म्हणाले. पंतप्रधानांना मूळ गोष्टी समजत नाही, नको ते बोलतात. आपण हळूहळू हुकूमशाहीकडे चाललो असल्याचे म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. काही झालं तरी चालेल पण हुकूमशाही आली न पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे असे पवार म्हणाले. लोकशाही संस्था उद्धवस्थ करायच्या हीच मोदींची गॅरंटी असल्याचे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांना मूळ गोष्टी समजत नाही, नको गोष्टी करतात असा टोलाही पवारांनी लगावला. 


कोणताही नवीन प्रकल्प निघाला की तो गुजरातला जातो


मोदी सरकारच्या काळात कोणताही नवीन प्रकल्प निघाला की तो गुजरातला जातो. औ,धाची रायगडमध्ये होणारी कंपनी गुजरातला हलवली, पुण्यातील एक कंपनी गुजरातला हलवली. यांची नजर गेली की ओळखायचं आता हे हलणार असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली. देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना हे शोभत नसल्याचे पवार म्हणाले. सत्ताधारी राहुल गांधींवर टीका करतात, राहुल गांधींनी तुमचं काय घोड मारलंय असं देखील शरद पवार म्हणाले. 


जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत?


आज जिल्हा परिषदांच्या, पंचायत समितीच्या, ग्रामपंचाईतीच्या निवडणूका का होत नाहीत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. लोकशाही संस्था उद्धवस्थ करायच्या ही मोदींची गॅरंटी असल्याचे शरद पवार म्हणाले. मोदी सत्तेवर राहणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच जवाहरलाल नेहरु यांच्यावर देखील टीका केली जातेय. ते आज हयात नसताना त्यांच्यावर टीका कशासाठी करायची असा सवालही पवारांनी उपस्थित केला.


माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरोधात पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. ही लढत अत्यंत चुरशीची आणि तुल्यबळ मानली जातेय. त्यामुळं येणाऱ्या 4 जूनलाच भाजप माढयाची जागा कायम राखणार की शरद पवार गट ही जागा जिंकणार हे समजू शकणार नाही. मात्र, दोन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.  राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar on Narendra Modi : गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय, मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल