प्रेमविवाह केल्याने तरुणावर सामाजिक बहिष्कार
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2017 07:24 PM (IST)
याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील धनंजय पाटील याने गावातील एकाच गोत्रातील मुलीशी प्रेम विवाह केला. त्यामुळे गावातील लोकांनी धनंजय पाटीलला समाजातून बहिष्कृत केलं. एकीकडे जातीय भेदभाव मिटण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे समाजात बहिष्कृत केल्याच्या घटनाही घडत आहेत. उपनगर पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या नुसार 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.