मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या प्रवर्गाची सोडत आज पार पडली. राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.


मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.  प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.

राज्यातील महापालिकांची महापौर सोडत

खुला प्रवर्ग, सर्वसाधारण

  • मुंबई महानगरपालिका

  • पुणे महानगरपालिका

  • नागपूर महानगरपालिका

  • ठाणे महानगरपालिका

  • नाशिक महानगरपालिका

  • कल्याण -डोंबिवली महानगरपालिका

  • सांगली महानगरपालिका

  • उल्हासनगर महानगरपालिका


खुला प्रवर्ग, महिला आरक्षित

  • नवी मुंबई महानगरपालिका

  • जळगाव महानगरपालिका

  • भिवंडी महानगरपालिका

  • अकोला महानगरपालिका

  • पनवेल महानगरपालिका

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

  • औरंगाबाद महानगरपालिका

  • चंद्रपूर महानगरपालिका


अनुसुचित जमाती

  • वसई विरार महानगरपालिका


अनुसूचित जाती (महिला)

  • अहमदनगर महानगरपालिका

  • परभणी महानगरपालिका


अनुसूचित जाती

  • मीरा भाईंदर महानगरपालिका


मागास प्रवर्ग (महिला)

  • नांदेड महानगरपालिका

  • सोलापूर महानगरपालिका

  • कोल्हापूर महानगरपालिका

  • मालेगाव महानगरपालिका


मागास प्रवर्ग

  • लातूर महानगरपालिका

  • धुळे महानगरपालिका

  • अमरावती महानगरपालिका