पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

Maharashtra Lockdown : मोठी बातमी...! महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध!
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल ती मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 