मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांची सर्वसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता सर्वश्रूत आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. मात्र आपल्या नेत्याला कोरोनाची लागण झालेलं पाहून अनेकजण चिंतीत झालेत. असाच एक लहानगा बच्चू कडू यांच्यासाठी प्रार्थना करतानाचा व्हिडीओ स्वत: बच्चू कडू यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये हा लहानगा बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्याने ढसाढसा रडताना दिसत आहे. तसेच ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी तो प्रार्थना करताना दिसत आहे.

"बच्चू कडू भाऊंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे. त्यांना काहीच होऊ देऊ नको", अशी प्रार्थना करताना हा लहानगा दिसतोय आणि सोबतच हुंदके देऊन रडतही आहे. बच्चू कडू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, "बेटा मला काहीच होणार नाही. औषधीसोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही. तू रडला तर मला बरं वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर."

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट काल पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी", असं आवाहन त्यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाची लागण झालेले मंत्री

जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादीअस्लम शेख - काँग्रेसअशोक चव्हाण - काँग्रेसधनंजय मुंडे - राष्ट्रवादीसंजय बनसोडे - राष्ट्रवादीअब्दुल सत्तर - शिवसेनानितीन राऊत- काँग्रेससुनील केदार - काँग्रेसविश्वजीत कदम- काँग्रेसबाळासाहेब पाटील - राष्ट्रवादीहसन मुश्रीफ- राष्ट्रवादीप्राजक्त तनपुरे- राष्ट्रवादी

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधित झालेले लोकप्रतिनिधी

मकरंद पाटील - राष्ट्रवादीकिशोर जोरगेवार - अपक्षऋतुराज पाटील - काँग्रेसप्रकाश सुर्वे - शिवसेनापंकज भोयर - भाजपमाणिकराव कोकाटे - राष्ट्रवादीमुक्ता टिळक - भाजपवैभव नाईक शिवसेनासुनील टिंगरे - राष्ट्रवादीकिशोर पाटील - शिवसेनायशवंत माने - राष्ट्रवादीमेघना बोर्डीकर - भाजपसुरेश खाडे - भाजपसुधीर गाडगीळ - भाजपचंद्रकांत जाधव - काँग्रेसरवी राणा - अपक्षअतुल बेनके - राष्ट्रवादीप्रकाश आवाडे - अपक्षअभिमन्यू पवार - भाजपमाधव जळगावकर - काँग्रेसकालिदास कोलंबकर - भाजपमहेश लांडगे - भाजपमोहन हंबरडे - काँग्रेसअमरनाथ राजूरकर - काँग्रेसमंगेश चव्हाण - भाजपगीता जैन सरोज अहिरे

विधान परिषद सदस्य

सदाभाऊ खोत - भाजपसुजित सिंग ठाकूर - भाजपगिरीश व्यास - भाजपनरेंद्र दराडे - भाजप