Lingayat community News :  कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरु होण्याआधीच लिंगायत समाजाने (Lingayat community ) “आम्हाला जात म्हणून नव्हे, तर स्वतंत्र धर्म म्हणून नोंदवा” अशी मागणी उचलून धरली आहे. या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. लिंगायत समाजाने 2014 ते 2019 दरम्यान कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रात अनेकदा महामोर्चे काढले गेले होते ते याच मागणीसाठी. तीच जुनी मागणी पुन्हा नव्याने आंदोलनाचे रुप घेत आहे. या तिन्ही ठिकाणी असलेली या समाजाची संख्या निश्चितच राजकीय प्रभाव टाकणारी आहे.

Continues below advertisement


महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केली. याचा पाया समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वेदविरोधी विचार होता. इष्टलिंग धारण करुन पूजा करण्याची नवी पद्धत रुढ झाली. 350 हून अधिक जातींचे लोक यात सामील झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जनगणनेत लिंगायतांचा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख आढळतो.


लिंगायत धर्मातील वेगळेपण


हिंदू धर्मापासून भिन्न: हा धर्म अवैदिक मानला जातो.
संस्कार पद्धती वेगळी: लिंगायत, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मासारखाच दफनविधी
सुतक पद्धती नाही: जनन, मरण, उच्छिष्ट, जाती, रजस्व अशा सुतकांचे पालन नाही
समता: जातपात नाकारून सर्वाना एकसमान मान्यता.


का नाही मिळाली मान्यता?


भारतात शीख, बौद्ध, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन अशा अल्पसंख्यांक धर्मांना मान्यता आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात शीख जैन आणि लिंगायत यांचा उल्लेख स्वतंत्र धर्म म्हणून होता स्वातंत्र्यानंतर या तीन धर्माची मान्यता काढून घेण्यात आली. शिख आणि जैन धर्मीयांच्या संघर्षानंतर त्यांना मान्यता दिली लिंगायत ती मान्यता देण्यात आली नाही.


प्रमुख मागण्या काय?


1. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी
2. लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्यांक वर्गात सामाविष्ट करावे.
3. राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र नोंद घ्यावी.


लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्यास बीडच्या लिंगायत समाजाचा विरोध 


कर्नाटकमध्ये एकीकडे लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी केली जात असतानाच, बीडमध्ये मात्र लिंगायत समाजातील नागरिकांनी याला विरोध केल्याची दिसून येत आहे. लिंगायत हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक म्हणून राहिलेला आहे. लिंगायत धर्मातील चाली रूढी परंपरा हिंदू धर्माप्रमाणेच आहेत. मात्र महात्मा बसवेश्वरांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींना विरोध करण्यासाठी या पंथाची स्थापना केली असल्याचे लिंगायत समाज बांधवांकडून सांगण्यात आले आहे. आमचा देव महादेव असून शैव पंथाचाच एक प्रकार आहे. आम्हाला कुठल्याही वेगळ्या धर्माची गरज नाही. आम्ही हिंदू म्हणूनच जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार असल्याची भूमिका घेतली आहे. लिंगायत धर्म म्हणजे हिंदू धर्मातीलच वेगळा विचार आहे लिंगायत हिंदू दूध साखरेप्रमाणे एक झालेले आहेत. 


दिवाळी गणेशोत्सव महालक्ष्मी सगळे उत्सव साजरा करतो, आम्हाला हिंदू धर्माबद्दल अभिमान आहे. निवडणुका आले की असे प्रकार केले जातात. जात धर्माबाबत वाद निर्माण करणे हा निंदनीय प्रकार आहे. मुघलांच्या काळात असे प्रकार केले गेले. आम्ही हिंदूशी एकरूप झालेलो आहोत. वेगळा लिंगायत धर्म  मागण्यामागे राजकारण आहे. लिंगायताला वेगळा धर्म म्हणून मान्यता मागणे चुकीचे असल्याचे बीडमधीलनागरिकांनी म्हटले आहे. 


लिंगायत म्हणजे हिंदू धर्मातील एकेश्वर देववादी पंथ आहे, आम्ही भगवान शंकराचे भक्त आहोत म्हणून आम्ही हिंदू समाजातील सगळ्या रूढी परंपरा पाळतो. हिंदू धर्मात असलेला सांप्रदाय म्हणजे लिंगायत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदू आणि लिंगायत एक धर्म  झालेला आहे. 12 व्या शतकापासून महात्मा बसवेश्वरांनी समानतेसाठी प्रयत्न केले होते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ही स्वतंत्र धर्माबाबतचा वाद निर्माण केला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Karnataka : लिंगायत समूदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, जातीय सर्वेक्षणातून मोठी मागणी समोर