मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये 13 पैकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सभागृह सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल 14 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. 13 उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पक्ष), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पक्ष), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) या चार उमेदवारांनी आज आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य
भाजप
गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पक्ष), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पक्ष), रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भारतीय जनता पक्ष), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पक्ष).

शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).

राष्ट्रवादी काँग्रेस
शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).

काँग्रेस
राजेश धोंडीराम राठोड (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष).

Ram Shinde | खडसेंपाठोपाठ राम शिंदे यांची नाराजी उघड; चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना टोला