Laxmanrao Dhoble : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवरुन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला आहे. सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल तर शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा, असा थेट हल्लाबोल ढोबळे यांनी चढवला आहे.
अतिवृष्टीमुळे शेती पिके घरदारे जनावरे सगळे वाहून गेले आहे
लक्ष्मणराव ढोबळे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळेच आधी संघाची भाषा बोलणारे ढोबळे सर आता मात्र सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेती पिके घरदारे जनावरे सगळे वाहून गेले आहे.. शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे असून गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करा अशी मागणी ढोबळे यांनी केली आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.
कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे. कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणी साठा, विसर्ग याचा नियमित आढावा घेण्यात यावा. संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: