Laxman Hake on Radhakrishna Vikhe Patil: विखे पाटील कारखानदारांचा नेता असून ज्या ओबीसींनी त्यांना आजवर मतदान केले आहे, त्यांनी यापुढे विखे पाटील यांना मतदान करू नये, असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. विखे पाटील यांना कायदा आणि संविधान माहित आहे का? त्यांना आरक्षणाचे नियम माहित आहे का? राधाकृष्ण विखे पाटील नावाचा माणूस महा++++ माणूस आहे, यापुढे ओबीसी त्यांना मतदान करणार नाही, असे हाके यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

विखे पाटलांचे संपूर्ण घराणं बिनबुडाचा लोटा (Laxman Hake on Radhakrishna Vikhe Patil)  

लक्ष्मण हाके म्हणाले की, विखे पाटील यांचा संपूर्ण घराणं बिनबुडाचा लोटा आहे. कोणताही पक्ष सत्तेत आला की हे त्या पक्षासोबत सत्तेत असतात. यांची कोणतीही विचारधारा नाही, कारखाना चालवणे आणि पैसे कमवणे एवढीच यांची विचारधारा आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे, मागासवर्ग आयोगाचे, घटनेतील आरक्षणाचा मूलतत्त्व विखेंना मान्य नाही का?? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, विखे पाटील आता जरांगे पाटील यांची भाषा बोलायला लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटीलला सरकारचा प्रतिनिधी मानत नाही. कोण आहे हा विखे पाटील? त्यांना त्यांच्या नगर जिल्ह्यामध्ये ही कोणी मानतो का? त्यांच्या पाठीमागे माणसं नसताना ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहे, मात्र तो त्यांचा दिवा स्वप्नच ठरेल, मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असेही हाके यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री होण्यासाठी किती आमदार लागतात हे सुद्धा कळते का? 

जेव्हा जरांगे म्हणतात, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला मतदान करू नका, तर आमच्या आरक्षणावर संकट आले असताना, आम्ही ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका असे म्हणण्यात काहीही गैर नाही. ही ॲक्शन रिअॅक्शन आहे. मनोज जरांगे हे मनोरुग्ण आहेत आणि त्या मनोरुग्णाला जाऊन विखे पाटील सारखा माणूस जाऊन भेटला. विखे पाटील यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी किती आमदार लागतात हे सुद्धा कळते का?? अशी विचारणा हाके यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांना यापुढे ओबीसीने मतदान करू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचा मेळावा आम्ही लवकरच घेऊ. विजय वडेट्टीवार पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ओबीसींसाठी मोर्चा काढत आहेत, त्यात सहभागी होत आहेत. राहुल गांधी ओबीसींसाठी जातीय जणगणनेची भाषा करूनही काही काँग्रेस नेते या ओबीसी आरक्षणासाठीच्या मोर्चा सहभागी होणार नसेल, तर ओबीसी बांधव सर्व काही शांतपणे आणि सुज्ञपणे सर्व काही पाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे ओबीसी बद्दल कसे वागत आहे यावर ओबीसींचे बारीक लक्ष असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या