Laxman Hake on Bajrang Sonwane :  माणसाच्या मनात ईर्षा निर्माण करायची आहे. जरांगेला फेकून द्यायची वेळ आली आहे, असे म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. माजलेल्या लोकांना घरी बसवायचे आहे. चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती रे असं म्हणत बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सानवणे यांच्यावर देखील हाकेंनी टीका केली. सबका हिसाब बराबर होगा असे हाके म्हणाले. ओबीसी महाएल्गार मेळावा गेवराईमध्ये आयोजित केला होता, त्यावेळी हाके बोलत होते.

Continues below advertisement

मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचंय, आपली माणसं तारीख ठरवतील

तुझ्यात लई दम आहे ना तर फक्त राजीनामा द्या, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे यांना दिले आहे. - आमची माणसं तुझ्या मागे आली नसती तर तुम्ही निवडून आला असता का? असा सवालही हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना केला. तुम्ही आडवे या. हा महाराष्ट्र कुणाचा ते दाखवू असा इशारा हाकेंनी दिला आहे. मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचे आहे. आपली माणसं तारीख ठरवतील असेही हाके म्हणाले. इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय? असे हाके म्हणाले. 

गेवराईचा आमदार जातीवादी 

गेवराईचा आमदार जातीवादी आहे असे म्हणत हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. आम्ही बारामतीत यांची पुडी बांधायचे ठरवले आहे. मनोज जरांगेला सांगणे आहे की, त्यांच्या मागे एक महाराज उभे राहतात. तुम्ही आमच्यात आले ना तर 11 विवाह तुमच्या आमच्यात करु. ते आधी जाहीर करा असे म्हणत हाके यांनी मराठा समाजाला आव्हान दिले आहे. मागास पणाचे ढोंग आणता. विश्वास पाटील जातीवादी प्रवृत्तीचे आहात आम्ही तुम्हाला ओळखले आहे. आपली एकी फुटू द्यायची नाही. आम्ही संघर्ष उभा करत आहोत असेही हाके म्हणाले. 

Continues below advertisement

आमचा घात केला, केसाने गळा कापण्याचे काम केलं

आमचा घात केला आहे. केसाने गळा कापण्याचे काम केल्याचे हाके म्हणाले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेला जीआर आधी रद्द करा अशी मागणी हाकेंनी केली आहे.  दोन्ही समित्या आमने सामने बसवा. आरक्षणामुळे घरावर सोन्याची कावले बसत नाहीत, असे हाके म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake & Manoj Jarange: ज्यांच्यापासून संरक्षण हवं तेच लांडगे ओबीसींच्या कळपात शिरले तर... लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर हल्लाबोल