Laxman Hake on Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar) तर पोल्ट्री फार्म वाले आहेत. ते सर्व ओबीसींचा निधी अडवून बसलेत, असी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे. तर अमोल मिटकरी (Amol Mitkari) हा  फडतूस आहे. मी जर बोललो तर मिटकरी आणि त्यांचा आका अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, अशी खरमरीत टीका लक्ष्मण हाके यांनी केलीय. 

Continues below advertisement

 अजित दादांनी अर्थ खात्यात पीएचडी केलीय का?

गेल्या 20 वर्षापासून अर्थ खात्याला चिटकून बसलेल्या अजित दादांनी अर्थ खात्यात पीएचडी केलीय का? ते तर साधे कोंबडीच्या पोल्ट्री फार्म वाले असल्याचे हाके म्हणाले.  यांनी भटके विमुक्त आणि मागास महामंडळाला 50 पैसे सुद्धा त्यांनी दिले नाहीत, अशी सडकून टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली. हाके यांना दिलेल्या फॉर्च्यूनर गाडीवरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. त्या टीकेला हाके यांनी आज प्रत्युत्तर दिले. मी जर तुझ्या भाषेत उत्तर द्यायची वेळ आली तर तू आणि तुझा आका अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत असा इशारा हाके यांनी  दिला आहे. 

अमोल मिटकरी हा बाजारु विचारवंत

लक्ष्मण हाके यांना समाजाने फॉर्च्यूनर गाडी भेट दिली आहे. यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. यावर बोलताना हाके म्हणाले की, गाडी हे माझे साधन आहे. साध्य नाही. कोणाला टीका करायची ती करु द्या असे हाके म्हणाले. अमोल मिटकरीला बाजारु विचारवंत असे म्हटले जाते. मिटकरी अजितदादांच्या घरी झाडू मारतात, त्याबदल्यात त्यांना आमदारकी दिल्याचे हाके म्हणाले. आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिले तर त्याचीही कपडे राहणार नाहीत आणि अजितदादांची देखील कपडे राहणार नाहीत असे हाके म्हणाले. मिटकरी तू विधानपरिषदेचा सदस्य आहे. ओबीसीवर कधी बोलला का? अजितदादांनी ओबीसीसाठी एकदा तरी वसीगृह दिले का? असा सवाल यावेळी हाके यांनी केला आहे. अजित पवारांचे खासगी कारखाने अगणित आहेत असेही हाके म्हणाले. 

Continues below advertisement

अजित पवार काकांच्या जीवावर पुढे आले

अमोल मिटकरीने औकातीत राहावे असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. वरिष्ठ सभागृहाचता सदस्य असल्यासारखे त्याने बोलावे असे हाके म्हणाले. ज्या आण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिली जातो. पण ओबीसींच्या महामंडळाता दोन पाच कोटी अजित पवार देऊ शकत नाहीत असे हाके म्हणाले. अजित पवार हे पोल्ट्री चालवणारा माणूस, काकांच्या जीवावर ते पुढे आले आहेत असे हाके म्हणाले. मुळात सगळे सरकारमध्येच आहेत. महाराष्ट्राला विरोधकच उरला नाही. काँग्रेसमधीलही काही माणसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सगळे भाजपमध्ये सामील झाले आहेत असे हाके म्हणाले. दुर्दैव हे आहे की सामान्य माणूस आनवाज उठवू शकत नाही त्याचे मरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याचे हाके म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake: ओबीसी मंत्र्याला मिडिया ट्रायल करुन धमकावले जात असेल तर समाज रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात