Mumbai  Crime News :  मुंबईच्या बोरीवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सराफ व्यापाऱ्याला 30 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केलं आहे.  बोरीवली परिसरातील एका सराफ व्यापाऱ्याला स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचे सांगत व्हॉट्सअ‍ॅप कॉल-मेसेजद्वारे 30 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

Continues below advertisement

तक्रार मिळताच बोरीवली पोलिसांनी सापळा रचत आरोपींना घेतलं ताब्यात

तक्रार मिळताच बोरीवली पोलिसांनी सापळा रचत माहिम येथे सोने घेण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन बशीर याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईत बांद्रा व जोगेश्वरी येथे छापे टाकून आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून धमकी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा तपास बोरीवली पोलीस करीत आहेत.

सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल व संदेशांद्वारे खंडणीची मागणी 

दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान बोरीवली परिसरातील एका सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल व संदेशांद्वारे खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी आरोपींशी संवाद साधत खंडणीची रक्कम सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात देण्याचा बनाव केला. त्यानुसार सोने स्वीकारण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन मोहम्मद बशीर (वय 29) याला माहिम पश्चिम येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात बांद्रा व जोगेश्वरी पश्चिम येथून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मूळचे वासेपुर, जिल्हा धनबाद (झारखंड) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Continues below advertisement

आरोपींकडून खंडणीसाठी वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले 

आरोपींकडून खंडणीसाठी वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून फोनवरून संपर्क साधणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हालचाली सुरु केल्या होत्या. बोरीवली पोलिसांनी सापळा रचत माहिम येथे सोने घेण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन बशीर याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईत बांद्रा व जोगेश्वरी येथे छापे टाकून आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

Ratnagiri : बापाच्या मानेवर सुरा ठेवला अन् अपहरण केलं, एक लाख द्या नाहीतर ठार करेन, मुलाने आईला फोन लावत धमकावले