Latur News : निलंगा शहरातील टाऊन हॉल येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात अंतर्गत गटबाजी उफाळून आल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांचे दोन गट आमनेसामने आल्यानं काही काळ तणाव वाढला होता. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यामुळं मेळाव्यात गोंधळ उडाला आणि कार्यक्रमात व्यत्यय आला.

Continues below advertisement

शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

मंगेश कुडाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची समजूत काढली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहे. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. 

 

Continues below advertisement