एक्स्प्लोर

प्रकल्पात पाणी असूनही औसेकरांचा घसा कोरडा, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळं पाणीटंचाई

50 हजार लोकसंख्या असलेल्या औसा शहर सध्या कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटात आहे. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभार आणि वितरण व्यवस्थेतील अभावामुळं पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.

Latur : 50 हजार लोकसंख्या असलेल्या औसा शहर सध्या कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटात आहे. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभार आणि वितरण व्यवस्थेतील अभावामुळं पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे. औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी आणि उटी प्रकल्पात भरपूर पाणीसाठी असूनही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पाण्यामुळं औसेकर त्रस्त 

औसा शहरातील बिलाल नगर आणि समता नगर या भागातील महिला नगरपरिषदेत ठाण मांडून आहेत. मागील अनेक दिवसापासून व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा ही प्रमुख मागणी आहे. दहा ते पंधरा दिवसाला जे पाणी येतं ते दूषित आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पाण्यामुळं औसेकर त्रस्त आहेत. वेळोवेळी अर्ज विनंती केल्या, मात्र उपयोग नाही. यामुळं आज या महिलांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या रिकामा खुर्चीला निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे. औसा शहर ऐतिहासिक शहर म्हणून याची ओळख आहे, येथील किल्ला ऐतिहासिक काळापासून नावाजलेला आहे. या शहराची लोकसंख्या 50 हजाराच्या घरात आहे. आजूबाजूच्या खेड्याची बाजारपेठ म्हणून औशाची ओळख आहे. या शहराला पाणीपुरवठा करणारे माकणी धरण आणि उटी प्रकल्पात भरपूर पाणी आहे. मात्र, शहरात पाणी नाही अशी स्थिती आहे.

नवीन पाईपलाईनचे काम सुरु

औसा शहराची लोकसंख्या 50000 असून 5000 नळ जोडणी आहेत. अनेक अनाधिकृत नळ जोडण्या आहेत. दररोज औसा शहराला चार एमएलडी पाणी लागतं. औसा शहरात 25 वर्षांपूर्वीची पाईपलाईन अस्तित्वात आहे. नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. जुन्या वितरण व्यवस्थेमुळं सर्व शहराला पाणी देणे अशक्य आहे. वाढीव शहर भागात पाईपलाईनचे काम झालं नाही जे झाले ते तुटपुंज आहे. यामुळं वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. वाढीव शहराच्या अनुषंगाने पाईपलाईनचे मागील अनेक वर्षात झालंच नाही. धरणात दररोज पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. मात्र 15 दिवसातून पाणी येते. ते पाणी देखील दूषित आहे. पिवळं आणि हिरव्या रंगाचे पाणी आहे. याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. येथील मुख्य अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे त्यामुळे ते मुख्यालय नसतात.

पाण्यासाठी पैसा खर्च करण्याची वेळ

दहा ते पंधरा दिवसात पाणी येतं तेही दूषित मिळत असल्यामुळे  औसा येथील अनेक नागरिक संतप्त आहेत. समता नगर आणि बिलाल नगर भागातील महिला वेळोवेळी नगरपरिषदेमध्ये तक्रार घेऊन येत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. नगरपरिषदेचे काही भागांमध्ये बोर चालू आहेत. मात्र त्याचा बिघाड झाला तर पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये पाण्यासाठी खर्च करण्याची अनेक कुटुंबावर वेळ आली आहे. प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आहे. जुनी वितरण व्यवस्था, दूषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांकडे असलेला अतिरिक्त कार्यभार या सर्वांचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. धरणात पाणी असतानाही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांवर आर्थिक भूर्दंड बसत आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य

व्हिडीओ

ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget