धक्कादायक! नदीकाठी बॅगेत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, लातूर जिल्ह्यात खळबळ
लातूर (Latur)जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. वाढवणा-चाकूर रोडवर शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून
Latur : लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढवणा-चाकूर रोडवर (Vadhana-Chakur Road) शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह हत्या करून बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत होता. लांबपर्यंत दुर्गंधी पसरल्याने घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आहेत.
आठ महिन्यातील दुसरी घटना
या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर आठ महिन्यांपूर्वी हणमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता. ती मृत महिला कोण.? कुठली आहे खून कोणी केला याचा तपास अद्याप लागलेला नाही. दरम्यान पुन्हा एकदा याच भागात मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बॅगेत महिला असल्याच्या चर्चेमुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
खुनामागचं नेमकं कारण काय? याचा तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस, वाढवणा पोलिस स्टेशनचे अधिकारी, एलसीबी पथक तसेच मोबाईल व्हॅन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह कोणाचा आहे, खुनामागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरू असून या प्रकरणामुळे वाडवणा-चाकूर परिसर पुन्हा एकदा हादरला आहे.
अचानक नदीच्या काठावर बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं लातूर हादरलं
दरम्यान, अचानक नदीच्या काठावर बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं लातूर हादरलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. याच रस्त्यावर आठ महिन्यांपूर्वी हणमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी आढळला आहे. दरम्यान, या महिलेची हत्या करुन मृतदेह बॅगमध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे. याबाबतचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याचा देखील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या ही घटना उघडकीस आल्यानंतर वाढवणा-चाकूर रोडवर (Vadhana-Chakur Road) शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या तिरावर लोकांनी मोठी गर्दी केली होती.
महत्वाच्या बातम्या:
Nandurbar News : आदिवासींच्या जीवाला मोल आहे की नाही? नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ, नंदुरबारमध्ये मरणानंतरही मरणयातना!
महत्त्वाच्या बातम्या





















