लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लातूरमध्ये भाजपने मोठी झेप घेतली आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2012 साली लातूर महापालिकेत भाजपकडे एकही जागा नव्हती. मात्र, यंदा भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली.

लातूर महानगरपालिका निकाल 2012

  • काँग्रेस – 49

  • राष्ट्रवादी – 13

  • शिवसेना - 6

  • अन्य - 2


लातूर महानगरपालिका निकाल 2017

  • भाजप – 41

  • काँग्रेस – 28

  • राष्ट्रवादी – 01


लातूर महापालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर भाजुने विजय मिळवला आहे. त्यामुळे हुकूमाची गढी म्हणून ओळखली जाणारी लातूर महापालिका काँग्रेसने गमावली आहे.

संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील काँग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 31 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर आटोपली.

काँग्रेसने लातूरही गमावलं

काँग्रेसचा गढ म्हणून विलासराव देशमुखांच्या लातूरकडे पाहिलं जात होतं. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर काँग्रेसची सूत्रं आली. त्यांच्याच नेतृत्त्वात यंदा लातूर मनपाची निवडणूक लढण्यात आली. मात्र काँग्रेसला आपला गढ आणि देशमुखांची गढी राखता आली नाही.

संभाजी पाटील-निलंगेकरांचं यश

लातुर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. जिल्हा परिषदेप्रमाणेच संभाजी पाटील यांनी लातूर मनपासाठीही काटेकोर नियोजन करुन ऐतिहासिक विजय मिळवला.