लातूर: संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील काँग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 36 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 33 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर आटोपली. महत्त्वाचं म्हणजे 2012 मधील निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली आहे. तर  हुकूमाची गढी म्हणून ओळखली जाणारी लातूर महापालिका काँग्रेसने गमावली आहे. लातूर महानगरपालिका निकाल 2017 भाजप - 36 काँग्रेस - 33 राष्ट्रवादी - 01 काँग्रेसने लातूरही गमावलं काँग्रेसचा गढ म्हणून विलासराव देशमुखांच्या लातूरकडे पाहिलं जात होतं. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर काँग्रेसची सूत्रं आली. त्यांच्याच नेतृत्त्वात यंदा लातूर मनपाची निवडणूक लढण्यात आली. मात्र काँग्रेसला आपला गढ आणि देशमुखांची गढी राखता आली नाही. संभाजी पाटील-निलंगेकरांचं यश लातुर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. जिल्हा परिषदेप्रमाणेच संभाजी पाटील यांनी लातूर मनपासाठीही काटेकोर नियोजन करुन ऐतिहासिक विजय मिळवला. लातूर महानगरपालिका निकाल
पक्ष निकाल 2012 निकाल 2017
भाजप 00 36
काँग्रेस 49 33
राष्ट्रवादी 13 01
शिवसेना 06 00
अपक्ष/अन्य इतर 02 00

संबंधित बातम्या

लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा

चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरातही कमळ फुललं

परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष