लातूर : 'तुला स्वयंपाक चांगला करता येत नाही' असं क्षुल्लक कारण देत दारुड्या पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. लातुरातल्या धनेगावात ही घटना घडल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर पती विठ्ठल उर्फ सचिन धडे यानं पोबारा केला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धनेगावातल्या दीपाली धडेचा दीड वर्षांपूर्वी सचिनशी विवाह झाला होता. दारुचं व्यसन असलेल्या सचिनकडून दीपालीचा सतत छळ होत होता. छोट्या मोठ्या कोणत्याही कारणावरुन तिला मारहाण केली जायची.
रविवारीही रात्री दारु पिऊन आलेल्या सचिननं 'तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही' असं म्हणत भांडन उकरुन काढलं. त्यानंतर दीपालीच्या गळ्यावर चाकूनं वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या दीपालीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.