पाथर्डीत महिला कंडक्टरचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 03:38 PM (IST)
अहमदनगर: अहमदनगरमध्ये महिलांवरील अत्याचार कमी होण्याची लक्षण काही केल्या दिसत नाही. बसचा पास विचारल्यानं पाथर्डीत महिला कंडक्टरला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी सुरसवाडी बसमध्ये महिला कंडक्टरनं दोघांना पासची विचारणा केली. त्यावेळी दोघांनी एकच पास दाखवून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र फसवणूक लक्षात आल्यानं महिला कंडक्टरनं पास ताब्यात घेतला. महिला कंडक्टरनं पास ताब्यात घेतल्यानं दोघांनी बसमध्ये गोंधळ घालून महिलेला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी साहील पठाण आणि सद्दाम पठाण यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पाथर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत.