एक्स्प्लोर

बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार, इन्कम टॅक्स डेटा देणार, राज्य सरकार 'इतक्या' बहिणींना लिस्टमधून काढणार?

या माहितीवरून लाभार्थी महिलांची पडताळणी करून अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे .

Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे .या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत आहे . या योजनेत लाडक्या बहिणींच्या जवळपास 2 लाख अर्जांची छाननी केल्यानंतर  राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे . या योजनेत अनेक बोगस लाडक्या  बहिणींची आता पोलखोल होणार आहे . राज्यभरात नेमक्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती  हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे .ही माहिती मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारचा केंद्रशी संपर्क सुरू आहे .या माहितीवरून लाभार्थी महिलांची पडताळणी करून अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे.

आयकर विभाग देणार लाभार्थी महिलांचा डेटा

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेसाठी अपात्र असलेल्या 2200 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचं सांगितलं होतं. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील नियमित प्रक्रिया आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत पडताळणीची प्रक्रिया राबवली जात असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं .या प्रक्रियेत जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर जवळपास 2282 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं . यानंतर अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांसाठी बंद केली जाणार आहे .आता राज्यभरात किती पात्र महिला आणि किती अपात्र महिला आहेत याची सगळी माहिती राज्य सरकारला आयकर विभाग देणार आहे . त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत या डेटाची मदत होणार आहे .

या योजनेत सुमारे दोन कोटी 65 लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती .त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत . या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी 20 लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे .

कोणकोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवण्यात आलं?

  • 2.30 लाख महिला – संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी

  • 1.10 लाख महिला – वय 65 वर्षांहून अधिक असल्याने

  • 1.60 लाख महिला – चारचाकी वाहनं असल्यामुळे

  • 7.70 लाख महिला – नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या असल्याने

  • 2,652 महिला – सरकारी सेवेत कार्यरत असल्याने

लाडकी बहिण योजना

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट 2024 ला राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती .21 ते 65 वयोगटातील महिलांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1500 रुपयांची मदत या योजनेतून देण्यात येते .ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सामान्य मर्यादेपेक्षा जास्त असते त्यांना या योजनेअंतर्गत देयके देणे अपात्र ठरते .

हेही वाचा:

ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी...; लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला नाही; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी, छगन भुजबळांना डावलले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी, छगन भुजबळांना डावलले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Embed widget