एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटणाऱ्या 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, 15 कोटींची रक्कम वसूल होणार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनीच लाभ घेतल्याचे समोर आले. या कर्मचाऱ्यांची संख्या आता आठ हजारांवर पोहोचली आहे.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेतून (Ladki Bahin Yojana) मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. ही योजना फक्त गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी असूनही, हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) या योजनेचा लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सध्या अशा लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजारांहून अधिक झाली असून, या सर्वांकडून मिळालेला लाभ परत घेण्यासाठी शासनाकडून (Government) पावले उचलली जात आहेत. वित्त विभागाने (Finance Department) संबंधित विभागांना कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सुमारे 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

Ladki Bahin Yojana : योजनेंतर्गत कोण पात्र?

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फक्त वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांनाच लाभ देण्यात येतो. तसेच, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे. मात्र, तरीही अनेक कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून शासनाची फसवणूक केली.

Ladki Bahin Yojana : वसुली आणि शिस्तभंगाची कारवाई

महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने गैरवापर करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक तसेच इतर विविध विभागातील महिला कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा पेन्शनमधून टप्प्याटप्प्याने किंवा एकरकमी पद्धतीने रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेतला जात आहे.

Ladki Bahin Yojana : शिस्तभंगाची कारवाई होणार?

या प्रकरणाकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने पाहिले असून, महाराष्ट्र दिवाणी सेवा (आचरण, शिस्त आणि अपील) नियम 1979 नुसार दोषी महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. नेमकी कोणती कारवाई केली जाईल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Ladki Bahin Yojana : पेन्शनधारकही लाभार्थ्यांत

विशेष म्हणजे, फक्त कार्यरत कर्मचारीच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांनी देखील ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाकडून संबंधित विभागांना लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात येणार असून, पेन्शन विभागालाही पत्राद्वारे यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत.

Ladki Bahin Yojana : सरकारचे धोरण आणि पारदर्शकता

‘लाडकी बहीण’ ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. यासाठी 3,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, योजनेत बोगस लाभार्थी आढळून आल्याने सरकारने काटेकोर छाननी सुरू केली. यामुळे योजना गरजू महिलांपर्यंतच पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana: सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
Mumbai Crime : 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
दिंडोशीतील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget