Balumama Bhandara festival Adamapur : कोल्हापूरातील आदमापूरमध्ये (Adamapur ) मोठ्या उत्साहात बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव (Bhandara festival) संपन्न झाला. यावेळी बाळूमामाच्या मंदिरात भाकणूक करण्यात आली आहे. भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल. हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करतील. देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल अशी भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी केली. यावेळी भाकणूक ऐकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी जलाशय सगळे आटून जातील, 

कृष्णात डोणे महाराज यांनी केलेल्या भाकणूकीमध्ये नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळी भागात नंदनवन होईल, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघेल, देशात नवीन कायदा येणार, मोठी महामारी येईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी जलाशय सगळे आटून जातील, जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाडं पडेल, वादळ, भूकंप याने जगाची उलथापालथ होईल, गावातला मनुष्य जंगलात राहील. शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल,अशी भाकणूक करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Colors Marathi : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं!’ सुरु होणार समाधी सोहळा, मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप