Konkan Railway News : खासदार रविंद्र वायकर यांनी आज लोकसभेत कोकण रेल्वेच्या सक्षमीकरणाबाबत मुद्दा मांडला होता. कोकण रेल्वे ही किनारपट्टी भागासाठी जीवनवाहिनी असून, उर्वरित 263 किमी मार्गाच्या ट्रॅक दुहेरीकरणासाठी (Track Doubling) तयार होणाऱ्या डीपीआर (Detailed Project Report) ची पूर्णता कधी होईल, याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे प्रश्नोत्तर तासादरम्यान विचारणा केली. यावर बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, केरळ आणि कर्नाटकमुळे कोकण रेल्वेचा विकास रखडलेला आहे. 

Continues below advertisement

दुहेरीकरण पूर्ण झाल्यास रेल्वेची क्षमता आणि वेग वाढेल

कोकण रेल्वेची रचना वेगळी आहे. त्यावेळी कंपनी बनवली गेली, त्यात महाराष्ट्र , गोवा , केरळ , कर्नाटक शेअरहोल्डर्स असल्याचे अश्विनी वैष्णव म्हणाले. महाराष्ट्र आणि गोवा सरकारने झोनल रेल्वे मध्ये कन्व्हर्ट करायला मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. दुहेरीकरण पूर्ण झाल्यास रेल्वेची क्षमता आणि वेग वाढेल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, जलद आणि विश्वसनीय होईल. प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी लक्षात घेता, या मार्गावर अतिरिक्त 'वंदे भारत' रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही खासदार रविंद्र वायकर यांनी केली.

कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासह पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार

कोकण रेल्वेच्या विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यामुळे कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासह पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. कर्नाटक केरळ सरकारसोबत फॉलो अप सुरु आहे. त्यांनी झोनल रेल्वेत सहभागी होण्यासाठी मान्यता दिली पाहिजे. कोकण रेल्वे कंपनी नुकसानात आहे. 

Continues below advertisement

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचीही मागणी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चालला असून, गाड्यांचा प्रचंड विलंब आणि तिकिटांची टंचाई यामुळे चाकरमानी मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर, कोकण रेल्वेचे तातडीने दुपद्रीकरण करावे आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर्व संबंधित राज्यांची संमती प्राप्त झालेली असताना, आता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या विलीनीकरणामुळे कोकण रेल्वेला आवश्यक आर्थिक संसाधने उपलब्ध होतील. महाराष्ट्र आणि गोवा सरकारने झोनल रेल्वे मध्ये कन्व्हर्ट करायला मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यास रेल्वेची क्षमता आणि वेग वाढेल असेही ते म्हणाले.