पुढील पाच वर्षात मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार, मंत्री नितेश राणेंची माहिती
मुंबईसह ठाण्यातही पुढील पाच वर्षांत ‘कोकण भवन’ उभारणा असल्याची माहिती मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुंबई : मुंबईपसह ठाण्यातही पुढील पाच वर्षांत ‘कोकण भवन’ उभारणा असल्याची माहिती मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू, असेही राणे म्हणाले. ठाण्यातील शिवाई नगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजयुमोचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने महोत्सवाचे आयोजन
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्व. अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे 27 वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृती, शेतीउत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले आहे
मंत्री नितेश राणे म्हणाले, “वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे. आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा. मी स्वतःही आयुक्तांशी बोलेन.” असे स्पष्ट करून ना. राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेतीउत्पादनांना शहरांत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचे आवाहन केले. “मुंबईपासून तळ कोकणापर्यंत चिपळुण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत. कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. विविध संधी आम्हीच उपलब्ध करून देतोय. पर्यटन स्थळाच्या माध्यमातून या आपल्या 897 किलोमीटरची जी आपली किनारपट्टी आहे. त्याच्यामध्ये देखील संधी आहे उद्योग आहे. त्याच्या माध्यमातून पर्यटन आणि सागरी जे काही पट्ट्या आहेत. त्याच्या माध्यमातून जे काही संधी आहे. त्याच्या जास्तीत जास्त फायदा आमच्या तरुणांनी घ्यावा.
























