कोल्हापूर : स्कूल बस आणि कंटेनरचा अपघात झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कोल्हापुरातील हेरले - चोकाक मार्गावर हा अपघात झाला आहे. ही बस संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची आहे.
या अपघातात स्कूल बस मधील 16 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत तर कंटेनर मधील दोघे जण गंभीर जखमी आहेत. यात सुदैवाने कोणीही जीवितहानी झालेली नाही.
स्कूल बसला चुकवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटल्याने हा अपघात झाला. या अपघाताचा परिणाम हेरले - चोकाक मार्गावर झाला आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात, 16 विद्यार्थी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 12:02 PM (IST)
या अपघातात स्कूल बस मधील 16 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत तर कंटेनर मधील दोघे जण गंभीर जखमी आहेत. यात सुदैवाने कोणीही जीवितहानी झालेली नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -