(Source: ECI | ABP NEWS)
कोल्हापुरातील बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा, मालमत्तेचे सकाळपासून मोजदाद सुरु
कोल्हापुरात आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. आज कोल्हापुरातील एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
Kolhapur News : कोल्हापुरात आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. आज कोल्हापुरातील एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या उद्योगपतीच्या गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील सळई उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर तसेच त्याच्या कोल्हापूरमधील निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले आहेत. संबंधित उद्योगपतीच्या मालमत्तेचे सकाळपासून मोजदाद करण्यात आले. दरम्यान, या कारवाईवेली आयकर विभागाची प्रचंड गोपनीयता पाळली आहे.
कोल्हापुरात आयकर विभागानं एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी छापेमारी केली आहे. यामुळं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. कारखान्यासह निवासस्थानावर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. छापेमारी करण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयकर विभागानं ही कारवाई करताना गोपनियता पाळली आहे. दरम्यान, या उद्योगपतीच्या घरात मोठी गंगाजळी सापडल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
























