कोल्हापुरात चंद्रकांतदादांसमोरच अंबाबाईच्या श्रीपूजकाला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2017 07:51 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिर वादाने वेगळंच वळण घेतलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीतच अंबाबाई मंदिरातील पुजारी अजित ठाणेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. अंबाबाईला घागरा हे वस्त्र का नेसवलं, यावरुन गेल्या काही दिवसांपासून वादंग माजला आहे. हाच प्रश्न पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाविकांनी श्रीपूजकांना विचारला. त्यावेळी अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे ठाणेकरांना मारहाण करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी अंबाबाईच्या भक्तांनी पुजारी हटावच्या घोषणा देत एकच गोंधळ घातला आणि भ्रष्टाचाराचाही आरोप केला होता.