Kolhapur Accident News : कोल्हापुरात (Kolhapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकीनं महाविद्यालयीन विद्यार्थीनींना धडक दिल्याची घटना घडली आहे. कुरुकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे. या चारचाकीच्या धडकेत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रज्ञा दशरथ कांबळे ( वय 18) असं मृत्यू झालेल्या कौलवं येथील विद्यार्थीनीचं नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
कॉलेज संपल्यानंतर बस स्टँडवर उभारलेल्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, या घटनेनंतर कारचालकासह दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चालकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. नेमका हा प्रकार घडला कसा याचीही पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या मुलींवर उपचार सुरु आहेत.
बीडमध्ये एसटी बस आणि दुचाकीच्या अपघात पती पत्नी ठार
अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावरील (Ahilyanagar Ahmedpur Highway) पाटोदा (Patoda) इथं भरधाव एसटी बसने (ST Bus) दुचाकीस्वराला धडक दिली आहे. या अपघातात (Accident) पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. बाळू वाईकर आणि लता वाईकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी गावचे रहिवासी आहेत. आठवडी बाजारासाठी पाटोदा येथे येत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बस खाली आल्यानं या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हायड्रा क्रेनचा धक्का लागल्याने नवी मुंबई वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू
नवी मुंबई पोलिसांच हृदय पिळवटून टाकणारी एक दुःखद घटना घडली आहे. नवी मुंबईतील महापे ब्रिज खाली गणेश आत्माराम पाटील हे त्यांच्या कर्तव्यच्या हद्दीतील वाहतूक सुरळीत करत असताना हायड्रा क्रेनचा त्यांना धक्का लागला आहे. या धक्यात ते खाली पडले आणि क्रेनच चाक डोक्यावरुन गेल्याने वाहतूक कर्मचारी गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. हायड्रा क्रेन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
