कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांचा ग्रामीण भाषेतील लहेजा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते कधी काय बोलतील याचा नेम नसतो, हाच अनुभव काल जयसिंगपुरातील नागरिकांना आला.


"कोल्हापुरातील संघर्ष यात्रेत त्यांनी सरकारला चक्क बशा बैलाची उपमा दिली. तसंच गायीला आधार क्रमांक द्यायचं म्हणता, तर शेतकऱ्यालाही आधार द्या," असं म्हणत त्यांना सरकारला टोमणा मारला.

अजित पवार म्हणाले की, "हे सरकार म्हणजे बशा बैल आहे. हा बैल ढिम्म आहे, हलायलाच तयार नाही, काय करायचं?" "मात्र माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून अडचणीत आणून का, खरा अर्थ समजून घ्या," अशी विनंतीही त्यांनी केली.

"महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वारंवार कर्जमाफी मागितली नाही. चारही बाजूने अडचणीत आले म्हणून कर्जमाफीची अपेक्षा शेतकरी करत आहेच. शेतकरी ही जात उद्ध्वस्त होईल," अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.

"देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात असून हे भाजपवाल्यांचं यश आहे. हे लोक गायींना आधार क्रमांक देत आहेत, तसा त्यांनी शेतकऱ्यांना पण आधार द्यावा," असंही मत त्यांनी वक्त केलं.

पाहा व्हिडीओ