Karuna Sharma : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवत आहेत. अशातच करुणा शर्मा यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल खासदार पार्थ पवार यांनी मला संपर्क केल्यानंतर आणि विनंती केल्यानंतर मी उमेदवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र धनंजय मुंडे यांची पोस्ट बघून आणि स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन निवडणूक बिनविरोध व्हावी याचे श्रेय घेत असल्याचं दिसल्यानंतर, मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली. धनंजय मुंडेला आपल्या बायकोला फोन करुन अर्ज मागे घेण्याची विनंती करण्याचा कमीपणा वाटला, म्हणून मी ठरवलं की निवडणूक लढवायची असे करुणा शर्मा म्हणाल्या.
सहा तारखेला धनंजय मुंडे यांचा फोन आला आणि त्यांनी मला उचकवलं, करुणा शर्मांची टीका
मी बारामती पोट निवडणूक लढवणार नव्हते मात्र सहा तारखेला धनंजय मुंडे यांचा फोन आला आणि त्यांनी मला उचकवलं त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा विचार केल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. पार्थ पवार यांनी मला काल फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आमच्यासाठी ही निवडणूक दुःखातील निवडणूक आहे. त्यामुळं त्यांच्या फोननंतर मी ठरवलं की अर्ज मागे घ्यायचा असे करुणा शर्मा म्हणाल्या. मी आता ठरवलं की निवडणूक लढवायची माघार घ्यायची नाही. बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर एफ आय आर व्हायला हवा होता. इतर बारामतीतले काही प्रश्न ज्यामध्ये रस्ता शाळा यांसारखे प्रश्न घेऊन मी निवडणूक लढवणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महत्वाच्या बातम्या: