पोटगीची 60 लाखांची थकबाकी द्या, निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडेंच्या संपत्तीतील एका काडीचीही विक्री नको, करुणा शर्मांचे कोर्टात तीन अर्ज
धनंयज मुंडे यांच्या वकिलांनी हे सारे अर्ज स्वीकारले असून त्यांना 6 जूनला होणा-या पुढील सुनावणी या अर्जांवर आपलं उत्तर देण्याचे निर्देश कोर्टानं जारी केले आहेत.

Karuna Sharma : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते असा निर्वाळा मुंबईतील माझगाव न्यायालयाने दिल्यानंतर आता करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत .धनंजय मुंडे यांच्याकडून धमके आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे . धनंजय मुंडे आणि विरोधात दाखल झालेल्या याचिकेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत प्रॉपर्टीची विक्री करण्यात येऊ नये हा अर्जही करुणा शर्मा यांनी कोर्टात केला आहे . (Karuna Munde Dhananjay Munde)
शनिवारी वांद्रे कुटुंब न्यायालयात झालेल्या सुनावणीत धनंयज मुंडे यांच्या वकिलांनी हे सारे अर्ज स्वीकारले असून त्यांना 6 जूनला होणा-या पुढील सुनावणी या अर्जांवर आपलं उत्तर देण्याचे निर्देश कोर्टानं जारी केले आहेत.
नेमकं काय आहे अर्जांमध्ये ?
- माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला अजुनही धमक्या आणि आता एआयच्या माध्यमातून छळ सुरूच असल्याची तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- तसेच कोर्टानं पोटगीबाबत दिलेल्या आदेशांनुसार 60 लाखांची वसुली आणि करूणा यांच्या मालकीच्या संपत्तीची विक्री करू नये असे आदेश देण्याची मागणी करत करूणा शर्मा यांनी कोर्टात नव्यानं अर्ज केले आहेत.
- कोर्टाच्या आदेशानंतरही धनंजय मुंडेंकडून धमक्या आणि छळ सुरूच -
- प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करूणा शर्मा यांनी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं नव्यानं अर्ज केला आहे.
- धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
- ज्या व्हीडिओ आणि फोटोत आपण नाही, तरीही त्यात आपणं असल्याचं दाखवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे.
- तसेच कोर्टानं दिलेल्या आदेशांनुसार दर महा 2 लाख रूपये या हिशोबानं साल 2022 पासून आपण आजवर 60 लाख रूपये पोटगीस पात्र असल्यानं त्याची कोर्टानं धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी अशी मागणीही करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही कोर्टानं जारी करावेत अशी मागणी करत तीन स्वतंत्र अर्ज करूणा शर्मा यांनी आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कोर्टापुढे केले आहेत.
हेही वाचा:
























