Karuna Sharma on Manoj Jarange Dhananjay Munde: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल खुणे आणि दादासाहेब गरडला अटक केली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली. भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक झाली होती, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. आता मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माजी आणि जरांगे यांची ब्रेन टेस्ट करा, या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या की, जरांगे भाऊंनी जे सांगितले की त्यांच्याविरुद्ध कट-कारस्थान रचलं आहे. मात्र धनंजय मुंडे यांचा धंदाच तो आहे. जे लोक त्यांच्या विरोधात जातात, त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान रचतात. जरांगे पाटील यांचे लोक फोडण्यात आले. याची माहिती मला एक महिना अगोदर माहीत होती. दादा गरड माझ्या घरी तीन वेळा येऊन गेला. पोलीस अधिकाऱ्यांना एकच विनंती त्यांचा मोबाईल तपासा. धनंजय मुंडे आणि त्यांची रेकॉर्डिंग आहे त्यांचे मोबाईल तपासा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Karuna Sharma: माझी देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे
पाच लाख आणि गाडीची बाब त्यात आहे. दोन नोव्हेंबर रोजी तो माझ्याकडे येऊन गेला. मला पैसे मागितले. मला न्याय मागण्यासाठी मी जरांगे यांच्याकडे गेली होती. कराड याने मला बेदम मारहाण केली होती. त्याचे CCTV आहे. त्याने आपल्या पत्नीला मारले तो काय करू शकत नाही. मी मुंडे घराण्याची सून आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केले त्यामुळे त्यांची आणि माझी देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. माझ्याकडे देखील पुरावे आहेत. वेळ आल्यावर दाखवेल. माझ्या पाठीमागे कोणीही नाही. मला न्याय पाहिजे. मी दादा गरड याची रेकॉर्डिंग ऐकली आहे. त्याने मला पाच वेळ कॉल केला. माझ्या घरी आला होता, असे देखील करुणा शर्मा म्हणाल्या.
Manoj Jarange on Dhananjay Munde: काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, बीडचा कांचन नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीने गाडीला ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही, असा आरोप त्यांनी केलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा