मुंबई : धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगीच्या दाण्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात आज पुढची सुनावणी झाली . करुणा शर्मा यांनी कोर्टात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा आहे .दरम्यान, मला हिरोईनची ऑफर होती .पण मी नवऱ्यासोबतच राहिले .माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केलाय . धनंजय मुंडेने 27 वर्ष एकत्र राहून मला रस्त्यावर आणल्याचा दावा करताना त्या अक्षरश: ढसाढसा रडल्या. दरम्यान 27 वर्ष एकत्र राहिल्याचा करुणा मुंडेंचा दावा आहे . वकील चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही तर ते मी मांडते असे म्हणत करुणा शर्मांनी सुनावणीत स्वतःची बाजू मांडली . मात्र वकिलांना बोलू द्या ,योग्य ते ऐकून निर्णय देऊ असं न्यायालयाने सांगितले.(Karuna Sharma)
मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते . मात्र आपल्याला दरमहा 15 लाख रुपयांची पोटगी हवी असल्याचे करुणा शर्मांनी म्हटले होते .धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपण करुणा शर्मांशी लग्नच केलं नसल्याचा दावा केला होता . त्यामुळे न्यायालयाने करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते .त्यानुसार आज त्यांनी वसीयतनाम्यासह इतर पुरावे कोर्टासमोर सादर केले . (Mumbai Court)
धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मांचे सर्व आरोप फेटाळले
करुणा मुंडेंनी मुंबई सत्र कोर्टात सादर केलेले सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा आहे .वसीयतनामा स्विकृतीपत्रात धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत .काही ठिकाणी अंगठा लावला आहे .करुणा मुंडे यांनी पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनवला आहे .धनंजय मुंडे यांच्या रेशन कार्ड इंदोर मध्ये कसे काय असू शकते असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांचे वकील सायली सावंत यांनी कोर्टात उपस्थित केले आहेत .
करुणा शर्मांचा खळबळजनक दावा
आज मी कोर्टात सर्व पुरावे सादर केले आहेत .यात एक रेकॉर्डिंग सादर केलेले नाही पण ते करणार आहे .वसईतनामा स्वीकृती यावर ज्या सह्या आहेत जो अंगठ्याचा निशाणा आहे तो धनंजय मुंडे यांचाच आहे .राज घनवट यांची देखील त्यावर सही आहे .माझ्या घराच्या कर्जावर धनंजय मुंडे गॅरेंटर आहेत .पुरावे नसले असते तर मी समोर आले नसते .धनंजय मुंडे यांना प्रकरण दाबायचे आहे .मी त्यांची पहिली बायको आहे .जे मिळेल ते मिळेल .त्याच्याशी काहीही संबंध नाही पण मी पहिली बायको आहे हे मला सिद्ध करायचे आहे .धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे अकाउंट आहे .माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते मी मीडियाला देणार आहे .धनंजय मुंडे यांनी माझे जीवन रस्त्यावर आणले .आज धनंजय मुंडेंना घरात बसवले आहे .मी गाडी घेऊन आले त्यावरूनही हंगामा केला गेला .मला रस्त्यावर आणि मीडियावर आणणारा धनंजय मुंडे आहे .मला हिरोईनची ऑफर होती पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला .माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 करोड देणार होते .माझा पती एवढा वाईट नाही .पण त्यानं दलाल लोक बाजूला सांभाळले आहेत .माझ्या नावावर काहीही नाही .मला आणि माझ्या मुलांना कायम धमक्या दिल्या जातात .असा खळबळ जनक आरोप करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर केलाय.
हेही वाचा: