एक्स्प्लोर

कृष्णा आंधळेला कोण पैसा पुरवतं? त्याचा शोध घ्यायचा असेल तर धनंजय मुंडेंचा सीडीआर तपासा : करुणा मुंडे

कृष्णा आंधळेचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या घरच्यांचा तसेच धनंजय मुंडेंचा सीडीआर तपासा असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 

Karuna Munde on Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. याच मुद्द्यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णा आंधळेचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या घरच्यांचा तसेच धनंजय मुंडेंचा सीडीआर तपासा असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या गावी तीन वेळा येऊन गेला. असा दावा धनंजय देशमुख यांनी केला होता. यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. कृष्णा आंधळेचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या घरच्यांचा CDR तपासा किंवा धनंजय मुंडे यांचा सीडीआर तपासला तर त्याचा तपास लागू शकतो असं करुणा मुंडे म्हणाल्या. खूप काही सूत्र त्याला माहित आहेत, त्यामुळे तो लपून बसलाय. आंधळेला कोण पैसे पुरवत? त्याची जीविका कोण चालवत? असा सवाल करुणा मुंडे यांनी उपस्थित केला. 

नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख? 

कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात येत्या 26 तारखेला वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.

पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार, सुनावणीत आज नेमकं काय घडलं?

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आजच्या (21 फेब्रुवारी) सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा, अशा सूचना कोर्टाच्या वतीने सरकारी पक्षाला देण्यात आल्या आहेत. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे यासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे सादर केले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तर आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Womens Day 2026 Success Story : इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती
इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती, 98 टक्के घरीच पिकतो भाजीपाला
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Embed widget