बेळगाव : बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने ठेवले असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिवस पाळून भव्य सायकल रॅली काढण्यात आली. शांततेत काढलेल्या या रॅलीनंतर मराठी तरुणांवर कर्नाटक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. रॅलीत सहभागी मराठी तरुणांना रॅलीत सहभागी मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली. सोबतच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या गेल्या. या घटनेनंतर सर्व स्तरांतून संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.
अन्यायाने बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन पाळून भव्य सायकल फेरी काढण्यात आली. सायकल फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते. गेल्या 62 वर्षांपासून कर्नाटक राज्योत्सव दिनी समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळा दिवस पाळण्यात येतो.
"बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे," "रहेंगे तो जेल में नही तो महाराष्ट्र में", "जय भवानी जय शिवाजी," अशा घोषणा सायकल फेरीत सहभागी झालेले मराठी भाषिक देत होते. अनेकांनी आपल्या हातात विविध फलक धरले होते. निषेध करण्यासाठी म्हणून अनेकांनी काळे शर्ट, टी शर्ट परिधान केले होते. दंडावर काळ्या फिती देखील बांधून तरुण सहभागी झाले होते. ही रॅली शांततेत सुरु असताना कर्नाटक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
दरम्यान हे अमानुष असे कृत्य असून शांततेत चाललेल्या रॅलीवर लाठीमार करणे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असेही ते म्हणाले.
बेळगावात पोलिसांचा मराठी तरुणांवर लाठीचार्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2018 01:30 PM (IST)
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी मराठी तरुणांना रॅलीत सहभागी मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली. सोबतच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या गेल्या. या घटनेनंतर सर्व स्तरांतून संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -