Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation) ढिसाळ आणि निष्काळजीपणाचा कारभाराचा समोर आला आहे. याच निष्काळजीचा फटका नागरिकांना बसला आहे. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या एका कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) तब्बल 40 फूट खोल खोदकामामुळे, शेजारील दोन हायप्रोफाईल इमारतींना मोठा धोका निर्माण झालाय. केडीएमसी (KDMC) प्रशासन आणि खाजगी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या दोन्ही इमारतींच्या संरक्षण भिंती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून तब्बल 50 हून अधिक कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. कोट्यवधी रुपयांचं हक्काचं घर घेऊनही आज आमच्यावर बेघर होण्याची वेळ आलीय, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
KDMC : सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून थेट 40 फुटांपर्यंत खोल खोदकाम, 50 हून अधिक कुटुंबांचा जीव टांगणीला
डोंबिवली पूर्वेत केडीएमसीकडून एक कॅन्सर हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे. मात्र, हॉस्पिटल उभारताना कंत्राटदाराने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून थेट 40 फुटांपर्यंत खोल खोदकाम केलं. याचा परिणाम असा झाला की, शेजारी असलेल्या दोन मोठ्या हायप्रोफाईल इमारतींचा पायाच आता धोक्यात आलाय. दोन्ही इमारतींच्या सुरक्षेसाठी असलेल्या भक्कम भिंती काल रात्री पत्त्यासारख्या कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. केडीएमसी प्रशासन आणि कंत्राटदाराच्या या हलगर्जीपणामुळे इमारतीमधील 50 हून अधिक कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने या 50 हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र, "आयुष्याची पुंजी लावून, कोट्यवधी रुपयांचं घर खरेदी करूनही, प्रशासनाच्या चुकीमुळे आज आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ का आली? असा सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
Thane News : ठाण्यातील किसनगरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीचा भाग कोसळला, दोघेजखमी
दुसरीकडे, ठाण्यातील किसनगर ३ परिसरातुनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. याभागातील तिवारी भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीचा भाग कोसळलाआहे. यादुर्घटनेत घटनास्थळी दोन व्यक्तींना दुखापत झाली असल्याचीमाहितीआहे. नुरी इस्लाम शेख आणि सुरेश थापा असे दोघे यात गंभीर जखमी झालेआहे. तर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच उर्वरित इमारतीचा भाग धोकादायक स्थितीत असल्याने इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
