Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महापालिकेने (Kalyan Dombivli Municipal Corporation) अजब कारवाई केल्याने संपूर्ण सोसायटीला या कारवाईचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही रहिवाशांनी मालमत्ता कर न भरल्यामुळे तब्बल 90 फ्लॅटधारकांना शिक्षा मिळाल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli News) महापालिका अधिकाऱ्यांच्याया अजब कारवाईनंप्रशासनाचाभोंगळकारभारपुन्हाएकादासमोरआल्याचीचर्चारंगूलागलीआहे.

Continues below advertisement

Kalyan Dombivli News : ज्यांनी बिल भरले नाही त्यांच्यावर कारवाई करा, पण आम्हाला का शिक्षा देता?

कल्याणमधील हाय-प्रोफाईल योगीधाम कॉम्प्लेक्समधील फ्लोरा माउंट इमारतीत ही घटना घडली आहे. सोसायटीतील काही नागरिकांनी मालमत्ता कर भरला नसल्यामुळे महापालिकेने संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित केला. इतकंच नव्हे, तर सोसायटीतील बोरिंग कनेक्शनही तोडण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रहिवाशांनी महापालिकेच्या या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. ज्यांनी बिल भरले नाही त्यांच्यावर कारवाई करा, पण आम्हाला का शिक्षा देता? आम्ही सर्व कर वेळेवर भरले ही आमची चूक आहे का? असासवाल रहिवाशांनी केलाआहे. दरम्यान, केडीएमसी प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेणार, आणि रहिवाशांना दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

Continues below advertisement

Suresh Mhatre : एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

राज्यातील आगरी कोळी बांधवांची कुळदेवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा मंगळवार,बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे.या यात्रे निमित्त मुंबईपुणे एक्सप्रेसवे वर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे.या टोल माफिसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भक्तांसाठी टोल माफ होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे. एक्सप्रेस वे टोल प्रशासनाने आपली टोल माफीची विनंती ऐकली असून तीन दिवस ही टोल माफी सुरू राहणार आहे, एकविरा देवीच्या भक्तांनी वाहतूक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन करून यात्रेस यावे अशी विनंती देखील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी एकविरा देवी भक्तांना केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या