Dombivli News : निवडणुका संपताच डोंबिवलीतील 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह स्थानिक नेत्यांच्या आश्वासनानंतरही तोडक कारवाई?
KDMC : निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dombivli News : निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Demolition of Samarth Complex of Dombivli)
Dombivli News : घरांचे कर्ज सुरू, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडाव, कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही
दरम्यान, घरांचे कर्ज सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना आणि डोक्यावर या कारवाईची टांगती तलवार असताना या कारवाईच्या नोटीसमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आम्हाला आमच्या हक्काची रक्कम मिळाल्याला हवी, हक्काचे पैसे, अथवा घर देण्यात यावं, तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आश्वासन दिलं असताना आता पुन्हा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा शब्द महत्वाचा कि KDMC महत्वाची? असा सवालही या ठिकाणच्या स्थानिक महिलांनी विचारला आहे.
मुंबईच्या बोरिवली पश्चिम एम.एच.बी पोलीस स्टेशनचे शेजारी ओल्ड एम एच बी कॉलनी परिसर नशेचा अड्डा झालाय का? असा प्रश्न स्थानिकांना आता पडू लागला आहे. भाजप नगरसेवक शिवा शेट्टीकडून मध्यरात्री नशेच्या अड्डयाच्या ठिकाणी धाडी टाकत नशा करणाऱ्या 2 मुलांना रंगेहात पकडून नगरसेवकाकडून चोप देण्यात आलाय. नगरसेवकाच्या या धाडीमध्ये मुलं गांजा पीत असल्याचं समोर आलंय. यावेळी मुलाकडून गांजा सुद्धा जप्त करण्यात आला आहे. यानंतर नगरसेवक शिवा शेट्टी कडून भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडिओ कॉलद्वारे माहिती देऊन पोलिसांकडे कारवाईसाठी त्यांचा हाती देण्यात आले आहे. खरंतर मुंबई परिसर नशा मुक्त करण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी असते. मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केला जात असल्यामुळे भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप नगरसेवक शिवा शेट्टी कडून बोरिवली परिसर नशा मुक्त करण्याचं काम हाती घेण्यात आला आहे. शिवा शेट्टी कडून दररोज रात्री बोरिवली एम एच बी कॉलनी परिसरात पाहणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
























