एक्स्प्लोर

KBC : मोठी बातमी : पैठणच्या शेतकऱ्याने KBC मध्ये एकही लाईफलाईन न वापरता 50 लाख जिंकले, 1 कोटीचा प्रश्न सोडला, उत्तर तुम्हाला माहितीय?

Kailas Kuntewad KBC : पैठणच्या कैलास कुंटेवाड यांना एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या 15 व्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. असं असलं तरी त्यांनी 50 लाख रक्कम जिंकली.

मुंबई : संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्र अतिवृष्टीने (Marathwada Flood) बाधित आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदने महाराष्ट्र हळहळत असताना, त्याच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या यशाने हलकं का असेना, सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या यशाने स्मित आणलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट या पठ्ठ्याने करुन दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड (Kailas Kuntewad) यांनी एकही लाईफलाईन न वापरता, तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात कैलास कुंटेवाड यांची कमाल दाखवण्यात आली. कैलास यांनी तब्बल 14 प्रश्नांची उत्तर बिनचूक दिली. पुढे 1 कोटी रुपयांसाठी त्यांना 15 वा प्रश्न विचारण्यात आला.

Kailas Kuntewad KBC : शेतकऱ्याने जिंकले 50 लाख

कैलास कुंटेवाड यांनी पहिल्या प्रश्नापासूनच धडाकेबाज सुरुवात केली. कैलास यांनी 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. त्यानंतर त्यांनी साडेसात लाखांच्या 11 व्या प्रश्नांचंही उत्तर त्यांनी बरोबर दिलं. मग 12 व्या प्रश्नावेळी त्यांना ऑडियन्स पोल घ्यावा लागला, त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मदत घेऊन उत्तर बरोबर दिलं. एक लाईफलाईन संपली असताना, पुढची उत्तरं बरोबर दिल्याने त्यांची ती लाईफलाईनही जिवंत झाली.

Maharashtra Farmer In Kaun Banega Crorepati : क्रिकेटचं वेड

कैलास हे शेती करतात. महिन्याला 3-4 हजार रुपये अशी त्यांची कमाई. कैलास यांना क्रिकेटचं प्रचंड वेड. क्रिकेटपटू होऊन राष्ट्रीय संघात खेळण्याचं त्यांचं स्वप्न. पण घरची परिस्थिती गरिबीची, त्यात शेतकरी कुटुंब आणि ग्रामीण जीवन, त्यामुळे क्रिकेट हे फक्त मनोरंजनापुरतंच राहिलं. आता कैलास यांनी आपलं स्वप्न मुलांकरवी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ज्यावेळी कैलास कुंटेवाड यांना 13 वा प्रश्न विचारला, त्यावेळी ते थोडे संदिग्ध झाल्याचं दिसून आलं. परंतु त्यांनी एक पर्याय निवडला आणि तो अचूक आला. त्यानंतर 50 लाखांसाठीचा 14 वा प्रश्न विचारला आणि तोही बरोबर आला.

Kaun Banega Crorepati News : एक कोटीच्या प्रश्नासाठी क्विट  

अमिताभ बच्चन यांनी कैलास यांना एक कोटी रुपयांसाठी 15 वा प्रश्न विचारला. त्यासाठी कैलास यांनी संकेत सूचक लाईफलाईन वापरली. त्यातून हिंट मिळाल्यानंतरही कैलास त्या उत्तराबाबत साशंक होते. त्यामुळे त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली. दोन ऑप्शन गायब झाल्यानंतरही कैलास त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हते. शेवटी 50 लाखांच्या रकमेसह कैलास यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

Kaun Banega Crorepati 1 Crore Question : प्रश्न आणि त्याचं बरोबर उत्तर काय?

राष्ट्रपती भवनात असलेल्या विवियन फोर्ब्स यांनी बनवलेल्या इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस नावाच्या चित्रात काय दर्शविले आहे?

ऑप्शन ए - योहान फुस्ट

ऑप्शन बी - विलियम कॅक्सटन

ऑप्शन सी - योहानेस

ऑप्शन डी - रिचर्ड एम हो.

अचूक उत्तर- विलियम कॅक्सटन.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget