मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

अहमदनगर महानगरपालिकामध्ये वाहन चालक पदांच्या 2 जागांसाठी भरती निघाली आहे.

  • पदाचे नाव : वाहन चालक/ Driver
  • शैक्षणिक पात्रता : 
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय)
  • हलके वाहन चालविण्याचा परवाना
  • परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव
  •  मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : 10 ऑगस्ट 2021

मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड.

अधिकृत संकेतस्थळ : www.amc.gov.in 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती 

  • एकूण जागा : 25 हजार 271
  • पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

BSF, CISF, CRPF, SSB,ITBP,AR,NIA,SSF अशा फोर्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी ही भरती केली जाते आहे..

  • शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२१ (11:30 PM)
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
  • अधिकृत वेबसाईट - ssc.nic.in  

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती

  • एकूण जागा - 269
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
  • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
  • वयाची अट : 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट : bsf.gov.in वर जाऊन भर्ती पर्यायवर क्लिक करा तुम्हाला विस्ताराने संबंधित जागांविषयी माहिती आणि फॉर्म उपलब्ध होईल.