जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले ते शरद पवार गटात खूश नाहीत
जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil News : जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे पक्षामध्ये फार खुश आहेत असं मला वाटतं नाही. कालांतराने बघू यामध्ये आता काय काय बदल होतोय का. माझ्या संपर्कात ते नेहमी असतात मात्र याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणं झालं नाही असे गिरीश महाजन म्हणाले.
परिवार विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष शरद पवार गटात सुरु आहे. उबाठा तसेच काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. हा संघर्ष उभाळून आलेले आहे. मी माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा जावई यापुढे पक्ष जातच नाहीय. देशात अनेक पक्ष आहे की ते परिवाराशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत जेष्ठ कार्यकर्ते आहेत ते त्या पक्षातून बाहेर पडतील असा मला वाटतं. पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांची माझ्याशी कधी चर्चा झाली नाही. जयंतराव हे मोठे नेते आहेत. त्यांना जर काही बोलायचं असेल तर ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी बोलतील असे महाजन म्हणाले. आक्रमक राहण्यासारखा आता विरोधी पक्षांमध्ये काही राहिलेलं नाही असेही महाजन म्हणाले.
कोण एकनाथ खडसे? महाजनांचा टोला
एकनाथ खडसे यांच्या बाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारताच,कोण एकनाथ खडसे असा प्रति सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मी पर्यटन मंत्री असतानाच गड-किल्ल्यांची यादी आपण युनेस्को कडे सोपवली होती. त्याला आता मान्यता मिळाली आहे. पर्यटन स्थळ म्हणून अधिक बळकटीत आता या गड किल्ल्यांना मिळणार आहे. मनापासून या घटनेचे मी स्वागत करतो. सरकारचे आभार व्यक्त करतो. लाखो आपले जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस असल्याचे महाजन म्हणाले.
रोहित पवार यांच्या विरोधात इडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी काय काय चुका केल्या असतील भ्रष्टाचार केले असतील ते समोर येतील. नसतील केले तर त्यांचे काही होणार नाही, आणि केले असतील तर त्या या चौकशीतून ते सुटणार नाही असेही महाजन म्हणाले. शिरसाट यांचं म्हणणं आहे ते कपड्यांची बॅग आहे त्या बॅगमध्ये पैसे नाहीत. पण आता फिल्म बनली कशी कोणी केली,का केली, याबाबतीत सर्व साशंकता आहे.
अनेक आमदार खासदार संपर्कमध्ये
आम्हीही जर तुम्हाला बॅग खोलायला लावल्या तर त्यांच्या नेत्यांकडे ज्या बॅगा आहेत त्यांच्याकडेही मोठे घबाड आहे ना? असा गंभीर आरोप भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केला आहे. बॅगांमध्ये पैसे नाहीत असे त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र, जे काय असेल ते पोलीस तपास करतील.
आमदार खासदार अनेक संपर्कमध्ये आहेत. कायदेशीर अडचण आहे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे काही लोकांना घेता येत नाही असे महाजन म्हणाले.
एकनाथ खडसे विधान परिषदेत काही बोलत असतील तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ खडसे यांनी नार पार प्रकल्प खोऱ्याबाबत प्रश्नच चुकीचा विचारला होता. म्हातारपणामुळे माझी बुद्धी कमजोर झाली आहे असं स्वतःच एकनाथ खडसे यावेळी म्हटले होते. मला वेड लागलं असं काहीतरी ते म्हटले मात्र ते ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांना असं म्हणणार नाही. या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:






















