मी कोणत्याही बैठकीत सामील नव्हतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मला माहित नाही : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीच्या विलीणीकरणाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करुन घेतलं नव्हतं असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या विलीणीकरणाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करुन घेतलं नव्हतं. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो, त्यामुळं विलीनीकरणाबाबत मला काहीही माहित नाही असे आव्हाड म्हणाले. हे अगदी स्पष्टपणे आपण कृपया टीव्हीवर दाखवा. मी कुठल्याही बैठकीत सामील नसेल तर मला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. मला विलीनीकरणाबाबत काहीही माहित नाही असे आव्हाड म्हणाले.
एकनाथ शिंदेंची कामासंदर्भात भेट घेतली
गेल्या अनेक दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची माझी भेट झाली नव्हती. अनेक कामं पेंडिंग आहेत. त्या पेंडिंग कामासंदर्भात भेट घ्यायला आलो होतो, त्यांची भेट झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यात राजकीय काही चर्चा झाली नाही. मतदार संघातील काही निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घ्यावेत आणि ते लवकरात लवकर घ्यावेत यासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो असे आव्हाड म्हणाले.
निधीसंदर्भात आता ठोस पावले उचलली जातील शंभर टक्के उचलली जातील. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते कोण असेल याबाबत बोलतानाआव्हाड म्हणाले की, अजून त्यावर विचार केलेला नाही. अजून त्याच्यावर चर्चा नाही निर्णय नाही. आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलं असतं याच्यावर राजकारण चालत नाही असे आव्हाड म्हणाले. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महायुतीला समर्थन दिल्याच्या मुद्यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, ते एकटेच निवडून आले होते. त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतला आहे असे आव्हाड म्हणाले.
अजित पवार विमान अपघात, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार : जितेंद्र आव्हाड
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय व्यक्त केला आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. संशय कोणाला कशाचाही येऊ शकतो त्याला काय करणार आपण असे आव्हाड म्हणाले. अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावर बोलताना आव्हाड म्हणाले की, कोणीतरी संशय घेणार कोणीतरी तो खोडून काढणार. त्याच्यावर मी उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल मलाही वेळ कमी पडेल असे आव्हाड म्हणाले.
शरद पवार यांचा राज्यसभा कार्यकाळ संपणार आहे, याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, आत मधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारता. पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे असं जर हक्काने सांगता मग प्रश्न मला विचारुन काय फायदा मी तर त्या पक्षाचा पण नाही असे आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडीकडे तेवढी सदस्य संख्या नक्की आहे याचा महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकतो असेही आव्हाड म्हणाले.
मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं नाही, ते मला करणार नाहीत
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा शरद पवारांना शह असल्याचे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले होते. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, राम कदम हे बीजेपीचे आहेत त्यांना आत मधली माहिती असू शकते मला माहित नाही असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला काय करायचं आहे, मी काय त्या पक्षाचा अध्यक्ष होणार नाही, मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं नाही मला ते करणार नाहीत असे आव्हाड म्हणाले. कोण अध्यक्ष होणार हे मी संध्याकाळपर्यंत विचार करुन सांगतो असेही आव्हाड म्हणाले.

























