Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत असल्याचा पलटवार शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकांची सहानभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असं ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे, बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे, या गैरसमजातूनच ते मागे पडले, असा टोला आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला. अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये जिथं पिकतं तिथं विकत नसतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते
पवार साहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे अजून त्यांना कदाचित कळली नसेल. आम्ही एकनाथ शिंदे यांचा अनुभव घेत आहे, ते सुद्धा घेत आहेत. अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते, वडीलधाऱ्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलणे, वडीलधाऱ्या माणसाची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना आवडत नाही पटत नाही. अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावं हे लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती बॉस कोण आहे. कामाशिवाय देखील आपलं नातं असतं. कुठलीही विधानसभा ही भवितव्याची निवडणूक असते. महाराष्ट्र भवितव्य कोण देणार हे सर्वांना माहिती आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.
एकही माणूस त्यांच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नव्हता
मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांची राष्ट्रवादी पक्षामध्ये दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नव्हता. उगीच तक्रार पवार साहेबांकडे गेली आपल्यावर पवार साहेब नाराज होतील. त्यामुळे कोणीच बोलायचे नाही. त्यांना आता इथं पवार साहेब नाहीत. त्यामुळे कोण कोणाला घाबरत नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावरून आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
इतर महत्वाच्या बातम्या