मुंबई वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकत नाही, 80 वय झालं तरी काहीजण निवृत्त होत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.  अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)  गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad)  प्रत्युत्तर दिले आहे. बापाला रिटायर करायच नसतं...बाप हा  बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिला आहे.


जितेंद्र आव्हाड म्हणाले,  बापाला रिटायर करायचे नसते. बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो. बाप कुटुंबातील ऊर्जा स्रोत आहे.


काय म्हणाले अजित पवार?


अजित पवार म्हणाले, वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही. बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबयच असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील 5 वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असेही अजित पवार नमूद केले. 


शरद पवारांची टीका


राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही मिळेल त्या व्यासपीठावर अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून टीका करण्याची संधी सोडली नाही. शरद पवारांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय 82 होऊ द्या किंवा 92 होऊ द्या. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या 


हे ही वाचा :


Ajit Pawar : 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, हट्टीपणा सुरुच आहे; अजितदादांचा शरद पवारांना टोला