लातूर : JEE परीक्षेच्या तारखा आपल्या बारावी बोर्डाच्या परीक्षांबरोबर क्लॅश होत आहेत. बोर्डाच्या परीक्षेचा तिसरा आणि चौथा टप्पा क्लॅश होत आहे. अभ्यासक्रम संपलेला नसल्यामुळे पहिला आणि दुसरा टप्पा उपयोगाचा नाही. अभ्यासक्रम तोपर्यंत संपत नाही, असं पालकांचं म्हणणं आहे. बोर्डाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांच्या तारखा 12 वी बोर्ड बरोबर क्लॅश होत आहेत. त्यामुळं एप्रिलऐवजी जूनमध्ये बोर्डाच्या परीक्षा घ्या, अशी मागणीही पालकांनी केली आहे.


तसेच 50 टक्के एमसीक्यू पध्दतीने परीक्षा घेण्याची मागणी केली आङे. CBSC नी 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. राज्य बोर्डाने 25 टक्के. पण दोन्हीमध्ये ताळमेळ नसल्याने मुलांना प्रत्यक्षात 100 टक्के अभ्यासक्रम करावा लागला. दहावीचे मुले परीक्षेसाठी तयार असून त्यांची प्रात्यक्षिकं मात्र झालेली नाहीत. बारावीच्या तारखा जाहिर करताना मंत्र्यांनी व्यावसायीक अभ्यासक्रम (मेडिकल, इंजिनिअरींग , आर्किटेक्ट ) यांचा विचार केलेला नाही, असं पालकांचं म्हणणं आहे.


SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा


कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.


परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.


कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. राज्यात नववी ते बारावीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी रोजी 21,66,056 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, तर 21287 शाळा सुरू आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं होतं.


कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.