Jayant Patil meets Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. जयंत पाटील मातोश्रीतून बाहेर आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही जागांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सुरु आहे. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसनेते वादाची ठिकणी पडल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावर मार्ग काढू अशी माहिती नेते देत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी उद्या पत्रकार परिषद, जागावाटपाचा निर्णय जाहीर होणार
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या (21 ऑक्टोबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ( Press conference) होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार आहे. कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली. महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. 15 तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचती माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
भाजपने 99 जणांची यादी केली जाहीर
भाजपने 99 जणांची यादी जाहीर करूनही महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भामधील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात घमासान सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील गुंता वाढत चालला आहे. महाविकास आघाडीकडून उद्या (21 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं कोण किती जागा लढवणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: