Jayant Patil : राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Govt) स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यानंतर आता मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याची राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा सुरु आहे. याबाबात प्रतिक्रिया देताना राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. सत्ता मिळाल्यावर सगळे वाद मिटतात. भाजप जे सांगेल ते त्या दोन पक्षाला मान्य करावं लागेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 


आमचे सगळे आमदार आणि खासदार एकसंध


शरद पवार गटाचे काही अनेक खासदार अजित पवार संपर्कात असल्याच्या वक्तव्याबाबत देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या जाग मिळून देखील त्यांची (भाजपची) भूक मिटली नसेल तर भाजप काहीही करु शकते. आमचे सगळे आमदार आणि खासदार एकसंध आहेत असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


महाराष्ट्रात 5 तारखेला पक्षाची कार्यकारणी बैठक


शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी देशातून कार्यकर्ते दिल्लीत आले आहेत. आम्ही देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार आले तेव्हा मी इथे नव्हतो. मला ते येऊन गेल्याचं समजल्याचे जयंत पाटील म्हणाले. वाढदिवस आहे त्यामुळं ती कौटुंबिक भेट आहे. महाराष्ट्रात 5 तारखेला पक्षाची कार्यकारणी बैठक होत आहे. आगामी निवडणुकी अनुषंगाने चर्चा होईल असे देखील जयंत पाटील म्हणाले. कार्यकर्ते काय भूमिका मांडतात बघू, एक देश एक निवडणूक हे अनेक दिवसांपासून सुरु असल्याचे जयंत पाटील म्हणाले. लोकसभेला 7 टप्प्यात निवडणूक हवी असल्याचे म्हणाले होते. राज्यात मात्र एका टप्यात निवडणूक घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यांना बहुमत मिळाल आहे, मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार सरकारचा असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनाच्या आधी तरी विस्तार करतील ही अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीनं सरकार स्थापन केलं आहे. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतची चर्चा सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?