Jayakumar Gore : सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर घरांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या पूरग्रस्तांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी केली जातेय. याच मुद्द्यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत. सध्या पूरग्रस्तांच्या शेतीचे व घराचे पंचनामे सुरु असून तातडीची मदत देण्यात आली आहे.

Continues below advertisement

आता मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार? याकडं सर्वाचं लक्ष 

गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाले, धरणे तुडुंब भरली होती. यामुळं मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाण्यातचा विसर्ग आला होता. त्यामुळं सीना नदीला महापूर आला. यामुळं शेती पिकांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. तर काही जणांची वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. याबाबत बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार? शेतकऱ्यांना किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.  प्रेम वयात करायचा असतं. आता तुमचे प्रेम करायचे वय राहिलं नाही तुम्ही त्याच्या पुढे गेला आहात. आता थोडा संघर्ष करायला शिका अशी टीका जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली. आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का? असा सवाल त्यांनी केला. लगेच प्रेमाच्या भाषा सुरु झाल्या. जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना माहिती आहे. पण प्रेमाची कळ जरा उशिरा आली आहे, असा टोला देखील गोरे यांनी निंबाळकरांना लगावला. 

Continues below advertisement

जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आलेली दिसेल 

पुढच्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका होणार आहेत. यावर देखील जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आलेली दिसेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या:

सोलापूरचे जिल्हाधिकारी थेट बांधवार, पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांच्या वेदना घेतल्या जाणून, साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित