एक्स्प्लोर

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले

षडयंत्र  करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली.

Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar : रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र  करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका केली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये मार्डी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.

फलटणचा शकुनी जिंकणार नाही

जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांना शकुनी मामाची उपमा  दिली. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. यमाने जीआर काढला आहे, पोटाला यायचं बंद केलं आहे. स्मशानभूमीत जायच्या आधीच ते फेडल्याशिवाय त्याला स्मशानभूमीत घेऊन जाणार नाही असा जीआर यमाने काढला असल्याचे गोरे म्हणाले. 

मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता

जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला त्यानंतर आमदार झालो संघर्ष केला. एकही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळं परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे. मान खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही कधी वाकला नाही. मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता. मी फलटणशी आणि साताऱ्याशी तडजोड केली असती तर राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभं करु शकलो नसतो. त्यांना पाणी देऊ शकलो नसतो असे गोरे म्हणाले. 

मला संपवता संपवता तेच घरी बसले

माझी बाजू सत्याची होती मी संघर्ष केला. सत्याचा आयुष्य जास्त असते. आजपर्यंतचा इतिहास आहे रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही. मला संपवता संपवता मी संपलो नाही मात्र त्यांना संपावे लागलं. त्यांना घरी बसावं लागलं. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. अनेकांना काळजी आहे, अनेकांनी केसमध्ये नाव आहे की नाही माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. त्यामुळं जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसेल तरी सुद्धा कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही असेही गोरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore : 'जे कधी पाकिस्तानात घडले नाही ते त्यांनी इथे करून दाखवले'; मंत्री जयकुमार गोरेंची माळशिरसच्या सभेतून तूफान फटकेबाजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget