Jayakumar Gore : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला (Pahalgam terror attack ) केल्याची घटना घडली. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन पाकिस्तानवर (Pakistan) मोठ्या प्रमामात टीका होताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावरुन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी पाकिस्तानवर तोफ डागली आहे. युद्ध झाले तर काय होईल? हे वेगळे सांगायची गरज नाही. जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान गायब होईल असे वक्तव्य गोरे यांनी केलं आहे.

पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवला आहे. आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल. सर्व देश एकमुखाने मोदींच्या मागे उभे असून जग देखील भारताच्या मागे उभे असल्याचे गोरे यांनी सांगितले. राज्यात पहिलीपासून उर्दु भाषा सक्तीची करा अशी मागणी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मागणीची खिल्ली उडवत अशी कोणतीही गरज नसल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. आज आरण येथे सावता महाराज यांच्या चंदन उटी पूजेसाठी सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

नेक आमदार भाजपमध्ये येणार 

भाजपसोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही असे विरोधातल्या अनेक आमदारांचे मत झाल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. जी जनता निवडून देते त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. ती धमक भाजपात आहे. त्यासाठी अनेकांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली असून अनेक आमदार भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू

मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 26 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील देखील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक देखील जखमी झाले आहेत. त्यामुळं या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सर्वच पक्षांची नेतेमंडळी अधिक आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजडी देखील दिली जात आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचायला सुरुवात केली आहे. व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर सिंधू लज करार देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore : ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले, पण...; जयकुमार गोरेंचा विरोधकांना थेट इशारा